माय नगर वेब टीम -
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधून अपघाताची भयंकर घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या कन्नौजमध्ये आग्रा-लखनऊ एक्स्प्रेसवेवर अपघाताची भीषण दुर्घटना घडली आहे. या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर डझनभर प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा-लखनऊ एक्स्प्रेसवेवर स्लीपर बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या बसमध्ये एकूण ४० प्रवासी होते. या घटनेनंतर डीएम-एसपी तातडीने घटनास्थळी पोहोचले. या अपघातानंतर रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी वाहतूककोंडी सुरळीत केली.
उत्तर प्रदेशच्या कन्नौज जिल्ह्यातील सकरावा पोलीस ठाणे क्षेत्रातील आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस १४१ वर औरेया बॉर्डरजवळ ही अपघाताची भीषण घटना घडली आहे. या अपघातानंतर उत्तर प्रदेशच्या मंत्री स्वतंत्र देव सिंह हे जखमींच्या मदतीला धावले. त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवण्याचे निर्देश दिले. यामधील काही जखमींना सैफई मेडिकल कॉलेज आणि तिर्वा येथे पाठवण्यात आले. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
अपघात नेमका कसा झाला?
चालकाने बसवरील नियंत्रण गमावलं. त्यानंतर ही बस थेट ट्रकला जाऊन धडकली. या भीषण अपघातात प्रवाशांची भीती पसरली. घटनास्थळावरील लोकांनी काच फोडून प्रवाशांचा जीव वाचवला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. हा अपघात इतका भीषण होता की, रेस्क्यूसाठी अनेक तास लागले.
कन्नोजचे एसपी अमित कुमार आनंद यांनी सांगितलं की, या महामार्गावरील स्लीपर बसच्या अपघातातील मृतांची संख्या ६ वरून ८ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत १९ जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर आता रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालं आहे. या अपघातामधील मृतांना माहिती दिली जात आहे.
कन्नौजच्या अपघाताआधी पीलीभीतमध्ये भीषण अपघाताची घटना घडली होती. या अपघातात ५ लोकांचा मृत्यू झाला होता. तर चित्रकूट रस्ते अपघातात ६ लोकांना जीव गमवावा लागला होता. या अपघातानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केलं होतं.
Post a Comment