“आम्ही जीवाची बाजी केली, मात्र तरीही….”, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी व्यक्त केली खंत



माय नगर वेब टीम - 

नवी दिल्ली – भारताच्या लोकशाहीचे शिल्पकार, म्हणजेच मतदार पूर्वीपेक्षा अधिक परिपक्व झाले आहेत. मतदान का करावे लागते हे आजच्या मतदारांना माहीत आहे असे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटले आहे. तथापि, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शहरी भागात कमी मतदान झाले याबद्दलही त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. ते म्हणाले, आम्ही जीवाची बाजी केली, मात्र तरीही शहरी भागातील बूथवर कमी मतदार पोहोचले.

दरम्यान, राजीव कुमार यांनी निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनाही उत्तर दिले. ते म्हणाले, कवितेमध्ये अनेक रस आहेत. शृंगार रस, वीर रस, करुणा रस आणि आणखी अनेक रस आहेत. मला असे वाटते की निवडणूक आयोगाबाबत संपूर्ण सोशल मीडियावर निंदा रसाचा भरणा आहे. आज तुम्ही प्रशंसा केली आहे, म्हणजेच तुम्ही प्रशंसा रसाकडे जात आहात.

एका वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना ते पुढे म्हणाले की भारतात लोकशाही जिवंत ठेवण्याचे श्रेय पीठासीन अधिकाऱ्यांना म्हणजेच निवडणूक अधिकाऱ्यांना जाते. त्यांच्यामुळे निवडणूक आयोग काम करू शकला आहे. भारतात 10.5 लाख मतदान केंद्र आहेत. प्रत्येक बूथवर अंदाजे 4 ते 5 पीठासीन अधिकारी आणि अन्य निवडणूक कर्मचारी आहेत. म्हणजे ५५ लाख निवडणूक कर्मचारी. या ५५ लाख निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि या सर्वांची निवडणूक ड्युटीसाठी निवड करण्यात येते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post