मी शपथ घेतो की! ..... , देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ



माय नगर वेब टीम 

मुंबई - देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून ते राज्याचे २१ वे मुख्यमंत्री झालेत. देवेंद्र फडणवीस यांनी आज आझाद मैदानावर सीएम पदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जेपी नड्डा तसेच इतर भाजप शासित राज्यातील मुख्यमंत्री सुद्धा या सोहळ्याला आले होते.


मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे लगेच कार्यभार हाती घेणार आहेत. शपथ घेण्याआधी फडणवीस यांनी गो-पूजन केलं. त्यानंतर त्यांनी मुंबा देवी, सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन घेतलं. शपथविधीसाठी निघताना देवेंद्र फडणवीस यांच्या आईंनी त्यांचं औक्षण केलं. मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधीचा सोहळा पार पडला. फडणवीस शपथविधीसाठी मंचावर दाखल होताच कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केलं. मंचावर उपस्थित असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासोबत त्यांना हस्तादोलंन केले.


महायुतीच्या शपथविधीविषयी मोठा ड्रामा पाहायला मिळाला. मुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये शीत युद्ध सुरू झालं होतं. तर मुख्यमंत्रिपद गेल्यामुळे आणि गृहमंत्रिपदही मिळत नसल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होती. शिंदे नाराज असल्याने ते आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार नाहीत असंही म्हटलं जात होतं.


आज शिंदे यांच्या गटातील आमदार एकनाथ शिंदेंचे मन वळवण्यात यशस्वी झाल्यानंतर शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं सांगितलं. शपथविधी सोहळ्याला एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मंचावर आले. देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास जाणून घेऊ. आरएसएसचे स्वयंसेवक, सर्वात तरुण महापौर, मॉडेल आमदार ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री अशी गरुडझेप फडणवीस यांनी घेतलीय. फडणवीसांचा मॉडेल ते रोल मॉडेल हा प्रवास थक्क करणारा आहे.


देवेंद्र फडणवीस हे १९९२ मध्ये नागपूर महापालिकेचे युवा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर पाच वर्षात ते महापौर देखील बनले. फडणवीस हे सर्वात तरुण महापौर बनले. त्यानंतर त्यांना आमदारकीची संधीस मिळाली. १९९९ ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडणून आले. त्यानंतर महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनल्यानंतर ते २०१४ पुन्हा आमदार बनत पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. यानंतर २०१९ मध्ये फडणवीस यांनी विरोधी पक्षनेत्याची भूमिका साकारली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post