माय नगर वेब टीम
South Korea Plane Crash Video | दक्षिण कोरियात एक मोठा विमान अपघात घडला आहे. 181 जणांना घेऊन जाणारे विमान अचानक कोसळल्याने या दुर्घटनेत 179 जणांचा मृत्यू झाला. दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग दरम्यान विमान धावपट्टीवर अचानक घसरले आणि त्याचा स्फोट झाला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, विमानात 181 लोक होते. यामध्ये 175 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते. दक्षिण-पश्चिम शहर मुआनच्या विमानतळावर हा अपघात झाला. लँडिंग करताना कोरियन विमान धावपट्टीवर घसरले आणि विमानतळाच्या कुंपणाला धडकले. रिपोर्टनुसार, जेजू एअरचे विमान थायलंडहून परतत असताना मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा अपघात झाला.
नेमकं काय घडलं?
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान धावपट्टीवरून घसरले. यानंतर अवघ्या 10 सेकंदात नियंत्रण सुटलेल्या विमानाचा स्फोट झाला. स्थानिक वेळेनुसार ही दुर्घटना सकाळी 9 वाजून 7 मिनिटांनी झाली. या अपघातात सुरुवातीला 28 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. मात्र यात 179 जणांचा मृत्यू झाला असून केवळ दोन जण बचावले आहेत. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील एक प्रवासी आणि एक क्रू मेंबर आहे.
आठवडाभरात दुसरी दुर्घटना
दरम्यान, मागील आठवड्यात कझाकस्तानच्या अक्ताऊ विमानतळावर अझरबैजान एअर लाइन्सच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. विमानाचं आपत्कालीन लँडींग करत असताना नियंत्रण सुटून विमान कोसळलं. या अपघातात पायलट, कॅबीन क्र्यूसह एकूण 38 जणांचा जीव गेला होता.
Post a Comment