Devendra Fadnavis : मैं समंदर हूँ लौटकर वापस आऊँगा.! देवेंद्र फडणवीस यांचे गाजलेले डायलॉग एकदा पाहाच



माय नगर वेब टीम 

Devendra Fadnavis । Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते ‘देवेंद्र फडणवीस’ यांनी आज (दि. ५) मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला.


या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देशभरातील अनेक दिग्गज नेते आणि कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते.


आज अखेर मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते ‘देवेंद्र फडणवीस’ यांनी महाराष्ट्र राज्याचे २१ वे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यासोबतच शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीदेखील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.


मात्र, निवडणुकीच्या या रणधुमाळीत फडणवीसांनी जोरदार भाषणे तर केलीच पण, यासोबत त्यांचे काही डायलॉग देखील चांगलेच प्रसिद्ध झाले. सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीसांची डायलॉक बाजी खूपच फेमस झाली आहे.


मैं समंदर हूँ !

‘मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ लौटकर वापस आऊँगा!’ या शेरोशायरीचा समावेश आहे.


मी पुन्हा येईन !

‘मी पुन्हा येईन, गावांना जलयुक्त करण्यासाठी शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, ‘माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी मी पुन्हा येईन’


‘देवाभाऊ’

“मला माझ्या बहिणींनी ‘देवाभाऊ’ अशी साद घातलेली जास्त आवडते!” असं म्हटलेलं वक्तव्य देखील व्हायरल होत आहे.


फक्त खुर्ची पाहिजे…

एका मुलाखतीत ‘तुम्हाला राज्यात खुर्ची कंफर्टेबल आहे का?’ असा प्रश्न विचारला असता त्यांनी ‘राजकारण्यांना फक्त खुर्ची पाहिजे कम्फर्ट ते स्वत: शोधतात.’ हे दिलेलं उत्तरही सध्या चर्चेत आहे.


‘बटेंगे तो कटेंगे !

तसंच ‘बटेंगे तो कटेंगे’, एक रहेंगे तो सेफ रहेंगे ही घोषणा देतानाचे त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


छत्रपती शिवाजी महाराज..

त्याचप्रमाणे “मुंबई आणि महाराष्ट्राचा एकच बाप आहे आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.”

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post