माय नगर वेब टीम
Maharashtra Assembly Election 2024 – विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशानंतर जवळपास 13 दिवसांनी सत्ता स्थापन झाली. आता, मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले असताना दुसरीकडे विस्तार लांबणीवर पडणार असल्याची चर्चा आहे.
राज्य मंत्रिमंडळातील नावावर दिल्लीतून शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजते. सध्या राज्यातील महायुतीचे नेते यावर चर्चा करत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, याची चर्चा रंगली आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 11 किंवा 12 डिसेंबर रोजी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार 14 डिसेंबर रोजी होणार असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे इच्छुकांना आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.
Post a Comment