जोड नसलेल्या वस्त्यांच्या रस्त्यांना मंजुरी द्या; खा. नीलेश लंके यांचे मंत्री शिवराजसिंह चौहान यांना साकडे

 


माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर-   नगर लोकसभा मतदारसंघातील जोड नसलेल्या वस्त्यांच्या रस्त्यांचा सन २०२४- २५ च्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये समावेश करून त्यास मंजुरी देण्याचे साकडे खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय ग्रामविकास आणि कृषि, शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांना घातले. 

गुरूवारी खा. नीलेश लंके यांनी मंत्री चौहान यांनी भेट देऊन रस्त्यांच्या कामांसंदर्भात निवेदन सादर केले. या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, नगर लोकसभा मतदारसंघात रस्त्यांच्या जाळयाचा प्रचंड अनुषेश आहे. अनेक गावे मुख्य रस्त्यांना जोडलेली नसल्याने स्थानिक नागरीकांना तालुका किंवा जिल्हयाच्या ठिकाणी जाण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पावसाळयात नागरीकांना दैनंदिन जीवनामध्ये मोठा त्रास सहन करावा लागतो. दळणवळणात अडचणी येत असल्याने त्यांचे जनजीवन ठप्प होते. 

ग्रामीण भागातील रस्त्यांच्या समस्यांबाबत दखल घेऊन ग्रामीण जनतेचे जीवन सुलभ व्हावे, दळणवळणाला गती मिळावी यासाठी सन २०२४-२५ च्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये निवेदनातील नमुद रस्त्यांचा समावेश करून त्यास मंजुरी देण्यात यावी व शहरे किंवा गावांशी जोडण्यासाठी या कामांना निधीची तरतुद करण्याची विनंती खा. लंके यांनी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे केली.  

मंत्री चौहान यांनी खासदार नीलेश लंके यांच्या निवेदनाची दखल घेऊन सन २०२४-२५ च्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत निवेदनातील नमुद रस्त्यांना मंजुरी देऊन निधीची तरतुद करण्याची ग्वाही दिली. 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post