मुंबईत भरधाव बेस्ट बसने अनेकांना उडवलं; अपघातात ७ ते ८ जणांचा मृत्यू

 


माय नगर वेब टीम 

Mumbai best Bus accident : मुंबईच्या कुर्ल्यातून भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या कुर्ला एलबीएस रोडवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. या रोडवर भरधाव बेस्ट बसने रोडवरील अनेकांना उडवले. या अपघातात ७ ते आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील कुर्ला येथील एलबीएस रोडवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. कुर्ल्यातील एलबीएस मार्गावर भरधाव बेस्ट बसने अनेकांना उडवल्याची घटना समोर आली आहे. भरधाव बेस्ट बस अनेकांना धडक दिल्याने ७ ते ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बेस्ट बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बेस्ट क्रमांक ३३२ ही बस कुर्ला येथून अंधेरीकडे जात होती. त्याचवेळी बेस्ट बसचा ब्रेक फेल होऊन बुद्ध कॉलनीजवळील आंबडेकर नगर येथे हा अपघात झाला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post