सर्वांगीण विकासासाठी योगदान देणार : औटी
माय नगर वेब टीम
पारनेर : पारनेर नगरपंचायतीच्या स्विकृत नगसेवकपदी ॲड. मंगेश सुभाषराव औटी यांची मंगळवारी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते योगेश मते यांनी ॲड. मंगेश औटी यांच्या नावाची सुचना मांडली. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण योगदान देणार असल्याचे ॲड. औटी यांनी निवडीनंतर सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे स्विकृत नगसेवक डॉ. सादिक राजे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर नव्या नगरसेवकाची नियुक्ती करण्यासाठी नगरपंचायत नगरसेवकांच्या विशेष बैठकीचे पिठासीन अधिकारी तथा पारनेर-श्रीगोंद्याचे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्या उपस्थितीत बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत गटनेते योगेश मते यांनी ॲड. मंगेश औटी यांच्या नावाची सुचना मांडल्यानंतर ॲड.औटी यांनी स्विकृत नगरसेवक पदासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे पिठासीन अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्याकडे सुपूर्द केली. कागदपत्रांची छाननी केल्यानंतर चिंचकर यांनी ॲड. औटी यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली. निवडीनंतर चिंचकर यांच्या हस्ते औटी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्याधिकारी विनय शिपाई, दिपक लंके, नगराध्यक्ष नितीन अडसुळ, अर्जुन भालेकर, योगेश मते, राजू शेख, डॉ. विद्या कावरे, निता औटी, हिमानी नगरे, प्रियंका औटी, सुप्रिया शिंदे, भुषण शेलार, अशोक चेडे, डॉ. बाळासाहेब कावरे, भाऊ ठुबे, विजय भा. औटी, वैभव गायकवाड, अमित जाधव, कांतीलाल ठाणगे, अर्जुन बढे, दिपक नाईक, गणेश ठुबे, दिपक नाईक, मयुर औटी, धनंजय औटी, राजू पाचारणे, घनश्याम कार्ले आदी उपस्थित होते.
सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न
खासदार नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली स्विकृत नगरसेवक पदाच्या माध्यमातून आपण पारनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहोत. सन १९९२ मध्ये वडील ॲड. सुभाषराव औटी यांनी पारनेर ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर आता आम्हाला दुसऱ्यांदा शहर विकासासाठी योगदान देण्याची संधी प्राप्त झाली असून खा. नीलेश लंके यांनी दिलेल्या संधीचे सोने करू.
ॲड. मंगेश औटी - स्विकृत नगरसेवक
Post a Comment