माय नगर वेब टीम
मुंबई : बॉलिवूडमध्ये देसी गर्ल अशी ओळख असलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. तिची फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात मोठी फॅन फॉलोविंग आहे. ती एक ग्लोबल आयकॉन आहे. हॉलिवूडमध्ये गेल्यानंतर प्रियांका बॉलिवूडमधून गायब झाली. तिने मागच्या काही वर्षात एकही चित्रपट केला नाही. आता प्रियंका लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे.
प्रियंकाने केला मोठा खुलासा?
प्रियांकाने पुढील वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार असल्याचे जाहीर केले आहे. मी अनेक फिल्म मेकर्सना भेटतेय आणि मी बऱ्याच स्क्रिप्ट्सही वाचल्या आहेत. मला हिंदीत काहीतरी करायचे आहे ते मी सक्रियपणे शोधत आहे. हे वर्ष माझ्यासाठी खूप व्यस्त होते असे प्रियांका म्हणाली आहे.
‘या’ चित्रपटामधून करणार कमबॅक
प्रियांका चोप्रा फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आलिया भट्ट आणि कतरिना कैफदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. २०२१ मध्ये ‘जी ले जरा’ची घोषणा करण्यात आली होती. मात्र चित्रपटातील कलाकारांच्या तारखा मॅच न झाल्याने या चित्रपटाला विलंब झाला आहे.
Post a Comment