माय नगर वेब टीम
हैदराबादमधील संध्या थिएटर चेंगराचेंगरीप्रकरणी साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा बाउन्सर अँथनी याला अटक करण्यात आलीय. त्याच्यावर 4 डिसेंबर रोजी पुष्पा 2 प्रीमियर शोसाठी बाऊन्सर्सची टीम आयोजित केल्याचा आणि चाहत्यांना थिएटरच्या बाहेर ढकलल्याचा आरोप आहे, त्यामुळे चेंगराचेंगरी वाढल्याचं म्हटलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संध्या चित्रपटगृहात पुष्पा -२ चित्रपटाच्या प्रीमियम शो आयोजित करण्यात आला होता. या शोसाठी अभिनेता अल्लू अर्जुन आला होता. त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे येथे चेंगराचेंगरी झाली. यात एका महिलेचा मृत्यू झालाय. तर एक मुलगी गंभीर जखमी झालीय. या चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनच्या बाऊन्सरला अटक करण्यात आलीय. चेंगराचेंगरी घडण्यात अँथनीची चूक कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे.
थिएटरमधील धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज आता व्हायरल झाले आहे. यात अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी शेकडो चाहते थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. दुसऱ्या व्हिडिओंमध्ये, त्याचे बाउन्सर गर्दीला धक्काबुक्की करताना आणि बाहेर ढकलताना दिसत आहेत. यात मृत पावलेल्या चाहत्या रेवती देखील या चाहत्यांपैकी एक होत्या. चेंगराचेंगरी प्रकणी हैदराबादच्या चिक्कडपल्ली पोलीस स्टेशनमध्ये अल्लू अर्जुनची पोलिसांनी चौकशी केली गेली.
त्यानंतर काही तासांनी चेंगराचेंगरीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. अभिनेता अल्लू अर्जुन सकाळी 11 च्या सुमारास पोलीस ठाण्यात पोहोचला आणि चेंगराचेंगरीप्रकरणी पोलिसांनी त्याची जवळपास चार तास चौकशी केली. यात त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. अल्लू अर्जुनला विचारण्यात आले की त्याने त्याच्या आगमनाची माहिती थिएटर मालकांना दिली होती का, त्याने त्याच्या भेटीपूर्वी पोलिस आणि स्थानिक अधिकाऱ्यांकडून परवानगी मागितली होती का? त्याने इतर अनिवार्य सार्वजनिक प्रोटोकॉलचे पालन केले होते का, असे प्रश्न पोलिसांनी त्याला विचारले.
चेंगराचेंगरीप्रकरणी अल्लू अर्जुनला १३ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती आणि एक रात्र कारागृहात घालवल्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशी जामीन मिळाला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि सांगितले की या प्रकरणामुळे आणि त्यानंतरच्या अटकेमुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आणि ते "अपमान" आणि "चारित्र्य हत्येच्या" हेतूने केले गेले.
Post a Comment