Pushpa 2 : धक्कादायक ! पुष्पा 2 च्या प्रीमिअरदरम्यान चेंगराचेंगरी, महिलेचा दुर्दैवी मृत्यू



माय नगर वेब टीम 

3 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, ‘पुष्पा 2: द रुल’ हा चित्रपट आज थेटरमध्ये रिलीज झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने अल्लू अर्जुनच्या सिनेमाची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ दिसून आली. या चित्रपटासाठी मोठ्या प्रमाणात अडव्हान्स बूकिंग करण्यात आले आहे. चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी अत्यंत आतूर आहेत. मात्र या चित्रपटाच्या प्रीमिअर शो दरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे.

प्रीमिअर शो दरम्यान काय घडले?

तेलंगणच्या हैदराबादमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. तेथील संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरी होऊन महिलेचा मृत्यू झाला. रेवती असे मृत महिलेचे नाव आहे. तर या घटनेत एक 9 वर्षांचा बालकही जखमी झाला असून तो मृत महिलेचा मुलगा आहे. चित्रपटगृहात प्रेक्षकांची संख्या मर्यादाबाहेर गेल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.


या घटनेशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. थिएटरमध्ये सुमारे 200 पोलिस तैनात होते. त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत आई आणि मुलगा बेशुद्ध झाले. उपचारादरम्यान आईचा मृत्यू झाला, तर जखमी मुलाची प्रकृती चिंताजनक आहे.चित्रपट प्रदर्शनाच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


पुष्पा 2 या चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास रिलीजच्या आधीच चित्रपटाने करोडो रुपये कमावले आहेत. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. चित्रपटाच्या टायटल ट्रॅकसह अनेक गाणी प्रदर्शित झाली आहे. ‘अंगारो’, ‘किसिक’ आणि ‘पीलिंग्स’ सारखी गाणी यूट्यूबवर आधीच धुमाकूळ घालत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post