माय नगर वेब टीम“…
Ranbir Kapoor | अभिनेता रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाच्या मोठ्या यशानंतर चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची देखील चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यातच आता रणबीरने ‘ॲनिमल पार्क’ चित्रपटाच्या शूटिंगबाबत एक मोठी अपडेट शेअर केली आहे.
रणबीर कपूरने एका मुलाखतीत त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दलही सांगितले. रणबीर कपूरने ‘ॲनिमल पार्क’ची कथा उघड केली आहे. या चित्रपटाचे 2027 मध्ये शूटिंग सुरू करणार असल्याचे रणबीरने सांगितले.
रणबीर कपूरने असेही सांगितले की, ‘संदीप रेड्डी वांगा पहिल्या चित्रपटापासूनच कल्पना शेअर करत आहेत. जेणेकरुन दुसऱ्या भागासाठी काहीतरी नवीन समोर येऊ शकेल. पण यावेळी अनेक रोमांचक गोष्टी घडणार आहेत. यात दोन खलनायक असणार आहेत. ‘रणबीर कपूर या चित्रपटात नायकासोबतच खलनायकाचीही भूमिका साकारणार आहे.
‘बॉबी देओलने ‘ॲनिमल’ चित्रपटात अबरार हकची भूमिका साकारली होती. त्याचे पात्र पहिल्या भागातच संपले होते, त्यामुळे तो ‘ॲनिमल पार्क’मध्ये दिसणार नाही. रिपोर्टनुसार, या चित्रपटात खलनायक म्हणून विकी कौशल दिसणार असल्याचीही चर्चा सुरू आहे.
‘ॲनिमल पार्क’मध्ये रणबीर कपूर आणि विकी कौशलची जोडी दिसली, तर ती त्यांच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच असेल. रणबीर कपूरचा ॲनिमल डिसेंबर 2023 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने 900 कोटींहून अधिक कमाई केली होती. या चित्रपटात रश्मिका मंदान्नाने रणबीर कपूरच्या पत्नीची भूमिका साकारली होती. तर बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता.
Post a Comment