माय नगर वेब टीम
Captain Of RCB In IPL 2025: सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये २४ आणि २५ नोव्हेंबरला आयपीलचा मेगा लिलाव पार पडला. या लिलावात १८२ खेळाडूंवर कोट्यावधींची बोली लागली. या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मजबूत संघ निवडला आहे.
मात्र कर्णधार कोण होणा,याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही. संघाची यादी समोर येताच, विराट कोहलीच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. मात्र आता विराट नव्हे, तर बंगळुरुने रिटेन केलेल्या खेळाडूकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची जोरदार चर्चा आहे.
रजत पाटीदार होणार संघाचा कर्णधार?
रॉयल चॅलेजंर्स बंगळुरु संघाच्या कर्णधारपदासाठी विराट कोहलीचं नाव सर्वात पुढे होतं. विराटला नेतृत्व करण्याचा दांडगा अनुभव आहे. मात्र त्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता संघाला कर्णधाराची गरज असताना विराटचं नाव सर्वात पुढे होतं.
मात्र आता रजत पाटीदारला ही जबाबदारी सोपवली जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. रजत पाटीदार या संघाचा अनुभवी फलंदाज आहे. त्याची शानदार फलंदाजी आणि नेतृत्व क्षमता पाहून, या संघाच्या कर्णधारपदासाठी त्याचं नाव आघाडीवर आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत दमदार कामगिरी
भारतीय संघातून बाहेर असलेला रजत पाटीदार सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा खेळतोय. या स्पर्धेत खेळताना त्याने दमदार कामगिरी करुन दाखवली आहे. त्याने फलंदाजीत ७८,६२,६८,४ आणइ ३६ धावांची खेळी केली आहे. त्यामुळे आगामी हंगामात त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा नक्कीच वाढणार आहेत. तो या संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो.
कर्णधार म्हणून सुपरहिट
रजत पाटीदार फलंदाज म्हणून हिट आहे. यासह कर्णधार म्हणून सुपरहिट आहे. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत तो मध्य प्रदेश संघाचं नेतृत्व करतोय. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना मध्य प्रदेश संघाने ६ पैकी ५ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
या स्पर्धेत तर त्याने कर्णधार म्हणून दमदार कामगिरी केली आहे. आता आगामी हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु त्याच्यावर विश्वास दाखवणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Post a Comment