माय नगर वेब टीम
नागपूर – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या आदेशानुसार विधानपरिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जाहीर केला असून 19 डिसेंबर 2024 रोजी मतदान होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सभापतीपद रिक्त आहे. या पदासाठी 19 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी 18 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर अर्जांची छाननी होणार असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी जाहीर केले.
भाजपकडून राम शिंदेंचे नाव –
भाजपकडून राम शिंदे यांना संधी देण्यात येणार असल्याचे समजते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राम शिंदे हे कर्जत-जामखेड मतदारसंघातून आमदार रोहित पवार यांच्याकडून पराभूत झाले आहेत.
राम शिंदे यांनी ट्विट करत म्हंटले की, ” महाराष्ट्र विधान परिषद सभापती निवडणूक ” माझी उमेदवारी घोषित केल्याबद्दल देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब , उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब , उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार साहेब , त्याचबरोबर देशाचे गृहमंत्री श्री अमित भाई शहा साहेब, भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष श्री जे पी नड्डाजी , भारतीय जनता पार्टीचे राज्याचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे व एनडीएचे आणि महायुतीचे आणि सर्व नेते यांचे मी मनापासून आभार मानतो . टिप :- उद्या सकाळी विधान भवन नागपूर येथे १० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. धन्यवाद … – आ.प्रा.राम शंकर शिंदे.
Post a Comment