बालमहोत्सवाने प्रेक्षक मंत्रमुग्ध,नाट्य सादरीकरणातील बाल कलाकारांचा उत्साह वाखाणण्याजोगा
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर - नृत्य, नाट्य, गायन, वादन या रंगमंचीय कलांसोबत लहान मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या रंगमंचीय कलेचे, खेळांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे उद्दिष्ट घेऊन वाटचाल करीत बालकलावंतांना मोठे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने अहिल्यानगर येथील १०० व्या विभागीय मराठी नाट्य संमेलनात बाल महोत्सवाचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा आणि सिने नाट्य अभिनेत्री नीलम शिर्के - सावंत यांनी अहिल्यानगर येथील १०० व्या अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलनातील बाल महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी केले.
१०० व्या अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलनात आज तिसऱ्या दिवशी माउली सभागृहातील शाहू मोडक नगरीतील मोहन सैद रंगमंचावर नटराज पूजनाने बाल महोत्सवाला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के - सावंत यांच्या हस्ते या बाल महोत्सवाचे उदघाटन संपन्न झाले. स्वागताध्यक्ष डॉ. बापूसाहेब कांडेकर यांच्या हस्ते नीलम शिर्के - सावंत यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर स्वागाताध्यक्ष डॉ. बापूसाहेब कांडेकर, संमेलन प्रमुख क्षितिज झावरे, मध्यवर्तीचे कोषाध्यक्ष सतीश लोटके, अनंत जोशी, डॉ. सुधा कांकरिया, उपनगर शाखेचे अध्यक्ष प्रसाद बेडेकर, प्रमुख कार्यवाह चैत्राली जावळे, कोषाध्यक्ष जालिंदर शिंदे, बालरंगभूमी परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रसाद भणगे, डॉ. विजय जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. या उद्धघाटन प्रसंगी सादर होणाऱ्या एकांकिकांच्या संघांचा नीलम शिर्के यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या महोत्सवामध्ये जिना इसिका नाम है, हीच खरी सुरुवात, डस्टर, आणि कृष्णलीला या एकांकिका सादर करण्यात आल्या. बाल रंगभूमीला नव्या उंचीवर नेणाऱ्या या महोत्सवाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. नाट्य सादरीकरणातील बाल कलाकारांचा उत्साह आणि कलाकृतींची उंची प्रेक्षकांनी भरभरून कौतुकाने स्वीकारली. या संमेलनानिमित्त आयोजित रांगोळी प्रदर्शनास ही नीलम शिर्के यांनी भेट देत उपक्रमाचे कौतुक केले. उदघाटन समारंभाचे प्रास्ताविक प्रसाद बेडेकर, सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी तर चैत्राली जावळे यांनी आभार मानले.
Post a Comment