केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते 13 जानेवारी रोजी मैदानाचे भूमिपूजन होणार - आ. संग्राम जगताप
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : महाराष्ट्र राज्य व पहिल्यांदा जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वाडिया पार्क येथे दिनांक 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी रोजी संपन्न होणार असून आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनाची बैठक संपन्न झाली यावेळी पै. अनिल गुंजाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोनलकर, क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, काका शेळके, युवराज करंजुले, अभिजीत खोसे, सुरेश बनसोडे, संभाजी पवार, दिलीप पवार, वैभव ढाकणे, संतोष ढाकणे, मळू गाडळकर, अतुल कावळे, मोहन गुंजाळ, निलेश हिंगे, दादा पांडुळे, सचिन जगताप, भरत पवार, सागर गुंजाळ, चेतन शेलार, संजय शेळके, सोनू घेबुड, मंगेश खताळ आदी उपस्थित होते
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, वाडिया पार्क मैदानामध्ये पहिल्यांदाच 67 वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी स्पर्धा 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे तरी 13 जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते मैदानाच्या कामाचे भूमिपूजन सकाळी १० वाजता होणार आहे तसेच कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनाचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन देण्यात आले आहे. देश व राज्यभरातून कुस्ती पाहण्यासाठी मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमी येणार आहे तरी सुमारे ५० हजार जणांची बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे या ठिकाणी लाल मातीचे व मॅटचे असे दोन मैदान तयार केले जाणार आहे, देशात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा नावलौकिक होईल अशी तयारी केली जात आहे, अहिल्यानगर जिल्हा हा कुस्तीपटूंचा म्हणून ओळखला जात आहे नवीन कुस्तीगीर निर्माण करण्यासाठी त्यांना चांगल्या दर्जाच्या सुविधा व मार्गदर्शन देण्यासाठी वाडिया पार्क मैदानामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जेचे मैदान निर्माण होणार आहे महिलाही आता क्रीडा क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवत असून श्रीगोंदा तालुक्यातील भाग्यश्री फंड या कन्येने नॅशनल कुस्ती स्पर्धेमध्ये बाजी मारली असून आपल्या जिल्ह्याला नावलौकिक मिळवून दिला आहे असे ते म्हणाले.
जिल्ह्यातील 20 खेळाडूंचा सहभाग
आमदार संग्राम जगताप यांनी वाडिया पार्क मैदानात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या नियोजनाची बैठक मैदानातील मातीत बसून घेतली असून कुस्तीगिरांना नियोजनाची जबाबदारी दिली आहे. राज्यातून सुमारे साडे नऊशे कुस्तीपटू सामील होणार आहे, प्रत्येक जिल्ह्यातून माती व गादी गटातील २० खेळाडू सहभागी होणार आहे असे ते म्हणाले.
Post a Comment