केंद्रीय मंत्री अमित शाह, नितीन गडकरी साईचरणी लीन



माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर:  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिशिंगणापूर येथे श्री शनैश्वराचे दर्शन घेवून पूजा केली. यावेळी गृहमंत्र्यांच्या हस्ते श्री शनैश्वर मूर्तीस व उदासी महाराज मठात अभिषेकही करण्यात आला.

 यावेळी जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील उपस्थित होते.

       श्री शनिशिंगणापूर संस्थांनचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर यांनी गृहमंत्री अमित शाह यांना शनिदेवाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान केला.

तत्पूर्वी श्री. शाह यांचे हेलिपॅडवर आगमन झाले. अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी त्यांचे स्वागत केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन

 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी द्वारकामाई व गुरूस्थानचे दर्शन घेतले. 

 त्यांच्यासमवेत विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे, जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील होते.

श्री साईबाबा संस्थानच्यावतीने श्री.शाह यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तदर्थ समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्के), जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपस्थित होते.



तत्पूर्वी श्री.शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन झाल्यानंतर केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,  विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ ) राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे,  पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी त्यांचे स्वागत केले.

केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन

केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. याप्रसंगी त्यांनी द्वारकामाई व गुरूस्थान मंदिराचेही दर्शन घेतले. 



श्री साईबाबा संस्थानच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तदर्थ समितीचे अध्यक्षा तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्के), साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post