बुऱ्हाणनगर येथे मंगळवारी हळदी कुंकू समारंभ

  


आ. कर्डिले परिवाराची परंपरा ; महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर : बु-हाणनगर येथे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या परिवाराच्या वतीने हळदीकुंकू समारंभ आज  मंगळवार दि. २८ रोजी आयोजित करण्यात आला आहे. आ. शिवाजी कर्डिले यांच्या परिवाराकडून दरवर्षी संक्रांतीनंतर महिलांसाठी हळदीकुंकवांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.



सालाबाद प्रमाणे या वर्षी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला महिलांची वाढती संख्या लक्षात घेता महिलांच्या सोयीनुसार मतदार संघातील प्रत्येक तालुक्यासाठी वेगळे नियोजन करण्यात आले आहे.

     राहुरी तालुक्यातील महिलांसाठी दहा ते एक, पाथर्डी तालुक्यातील महिलांसाठी एक ते चार तर नगर तालुक्यातील महिलांसाठी चार ते सात वाजेपर्यंत नियोजन करण्यात आले आहे.  यावेळी अलकाताई कर्डिले, प्रियंकाताई कर्डिले, कु.शिवगामीनी कर्डिले या उपस्थित महिलांचे स्वागत करणार आहेत.

     तरी सर्व माता भगिनींनी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आ. शिवाजी कर्डिले यांच्या परिवाराकडून करण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post