पेट्रोलियम कंपनी अधिकाऱ्यांसह बैठक आयोजित करण्याच्या सुचना
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर - नगर शहरात भारत पेट्रोलियम कंपनीमार्फत घरगुती गॅस जोडण्या देण्याचे काम ९ सप्टेंबर २०१८ पासून सुरू असून अद्यापही संपूर्ण शहरात गॅस जोडण्या देण्याचे काम पुर्ण झाले नसल्याबाबत खासदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांचे लक्ष वेधले आहे. यासंदर्भात भारत पेट्रोलियम कार्पोरेशनच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्याची सुचना खा. लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनादवारे केली आहे.
या निवेदनात खा. लंके यांनी नमुद केले आहे की, भारत पेट्रोलियम कार्पोरेशनच्या वतीने नगर शहरात २०१८ पासून घरगुती गॅस जोडणी देण्याचे काम सुरू असले तरी हे काम अद्यापही अपुर्ण आहे. त्यासंदर्भात आपणाकडे स्थानिक नागरीकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. गेल्या सहा वर्षांपासून हे काम सुरू असताही हे काम पुर्ण झालेले नाही.
ही योजना केंद्र सरकाची असून संपूर्ण शहरात गॅस जोडणी देणे हे केंद्र सरकारचे उददीष्ट होते. परंतू भारत पेट्रोलियम कार्पोरेशनने हे उद्दिष्ट अपूर्ण ठेवलेले आहे.
संसदीय हिवाळी अधिवेशनादरम्यान आपण स्वतः केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरजितसिंह पुरी यांची भेट घेत या प्रश्नासंदर्भात चर्चा केली होती. त्यावेळी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करून या प्रश्नातून मार्ग काढण्यासंदर्भात मंत्री हरजितसिंह पुरी यांनी सुचित केले होते. त्या अनुषंगाने कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्याची सुचना खा. लंके यांनी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांना केली आहे.
Post a Comment