भातोडीच्या सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर ; ९ पैकी ७ मतदान अविश्वासाच्या बाजूने

 


: तहसीलदार संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया पूर्ण  

माय नगर वेब टीम 

 अहिल्यानगर : कामाचा गैरवापर व पदाचा अनियमित वापर करून शासकीय कामाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत भातोडी गावच्या सरपंच सौ. ज्योती विक्रम लबडे यांच्यावर ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव आणला आहे. एकूण ९ पैकी ७ सदस्यांनी अविश्वासाच्या बाजूने मतदान केले आहे. 

अहिल्यानगरचे तहसीलदार संजय शिंदे यांच्यासमोर ही सर्व प्रक्रिया पार पडली. सरपंच सौ. ज्योती विक्रम लबडे यांच्या विरोधात  अविश्वास ठराव १६ जानेवारीला तहसीलदार कडे दाखल केला होता. 

उपसरपंच राजू पटेल, ग्रामपंचायत सदस्य सुभाष घमाजी कचरे, सुनिता विक्रम गायकवाड, सुनिता जालिंदर लबडे, कैलास कुशाबा गांगर्डे, मुमताज शाकीर मुलानी, उल्फत युनुस पटेल या ७  सदस्यांनी विश्वास ठरावाच्या बाजूने स्वाक्षऱ्या केल्या आहेत. महिला सरपंच असल्याने  एकूण ९ पैकी ७ सदस्यांनी अविश्वास ठरावावर स्वाक्षरी केले असल्याने ठराव मंजूर करण्यात आला आहे.

ग्रामपंचायत कारभार करताना सदस्यांना   सरपंच ज्योती लबडे या कोणत्याही कामाबाबत विश्वासात घेत नव्हत्या.  कामाबद्दल विचाराना केली असता अरेरावीची भाषा वापरायच्या.  त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अफरातफर झाल्याचे दिसून येत होते.यामुळे आम्ही सर्वजण अविश्वास ठरावाच्या बाजूने आहोत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post