माय नगर वेब टीम
अहिल्यानगर -पाणलोट विकास घटक २.० या योजनेच्या १४० प्रकल्प क्षेत्रातील ३० जिल्ह्यांमधील गावांमध्ये पाणलोट यात्रेचे नियोजन करण्यात येणार असून या यात्रेचे योग्य नियोजन जलसंधारण विभागाने करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पाणलोट यात्रेचे नियोजन करण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,जिल्हा जलसंधारण अधिकारी पी. बी. गायसमुद्रे , जिल्ह्यातील एकूण सात प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी ,व कृषी, वन ,विभाग ,सामाजिक वनीकरण,शिक्षण ई विभागचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय भूसंसाधन विभाग ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार यांचे मार्फत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक २.० ही योजना राज्यात राबविण्यास शासनाने मान्यता प्रदान केली आहे. नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन घटकांतर्गत पाणलोट विकासाची कामे करण्यात येतात तसेच उपजीविका उपक्रम उत्पादन पद्धती अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो.
राज्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोस विकास घटक २.० या योजनेच्या १४० प्रकल्प क्षेत्रातील ३० जिल्ह्यांमधील गावांमध्ये पाणलोट यात्रेचे नियोजन करण्यात येणार असून त्याच्यामध्ये प्रकल्प क्षेत्रातील स्थानिक नागरिकांना मोबाईल थेटर व्हॅनद्वारे पाणलोट कामाबाबत आभासी सहलीचा अनुभव देण्यात येईल. गावोगावी पाणलोट चळवळ निर्माण व्हावी त्या अनुषंगाने हातात माती घेऊन मृद व व जल संरक्षण आणि संधारणाची शपथ घेणे, योजनेच्या प्रकल्प क्षेत्रातील नवीन जलसंधारण कामाचे भूमिपूजन करणे, पाणलोट कामांवर श्रमदान करणे, पाणलोट क्षेत्रात फळबाग लागवड करणे, पाणलोट क्षेत्रातील पूर्ण झालेल्या कामाचे लोकार्पण करणे,ई उपक्रम यात समाविष्ट आहेत. अहिल्यानगार जिल्ह्यामध्ये ऐकून सात प्रकल्प अंतर्गत पाथर्डी,अकोले,शेवगाव तालुक्यातील 14 गावांमधून पाणलोट यात्रेचे नियोजन करणेबत जिल्हाधिकारी यांनी जलसंधारण विभागासह सर्व यंत्रणांना निर्देश दिले.
Post a Comment