यशश्री प्री स्कूल ग्रामीण भागातील मुलांच्या भविष्यासाठी पर्वणी - मोकाटे

प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा ;  विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न 

माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर : तालुक्यातील जेऊर येथील यशश्री प्री स्कूल ग्रामीण भागातील मुलांच्या उज्वल भविष्यासाठी पर्वणी ठरत असल्याचे प्रतिपादन सैन्य दलात सिक्कीम येथे कार्यरत असलेले उद्धव मोकाटे यांनी केले आहे. यशश्री स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

        यशश्री प्री स्कूल येथे उद्धव मोकाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना मोकाटे यांनी देशसेवेचे महत्व सांगितले. तसेच  देशाच्या संरक्षणासाठी सैन्यदल कशा प्रकारे काम करते याची माहिती दिली. यशश्री स्कूल बद्दल बोलताना मोकाटे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पूर्वी फार संधी उपलब्ध नव्हत्या. सर्व सोयी सुविधा उपलब्ध होत नव्हत्या. परंतु सद्यस्थितीत ग्रामीण भागातील विद्यार्थीही सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत.



         यशश्री स्कूल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी एक पर्वणीच ठरत आहे. येथे वर्षभर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे उपक्रम लक्षणीय असे ठरत आहेत. स्कूलमध्ये सामाजिक एकता, एकोपा सर्व संत, महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देत असल्याने  स्कूलच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावतच आहे. यशश्री स्कूलने शैक्षणिक क्षेत्रात आपला आगळावेगळा ठसा निर्माण केला आहे, असेही मोकाटे यांनी सांगितले.

       शाळेचे संचालक राजेंद्र पवार यांनी शाळेमध्ये राबविण्यात येणाऱ्या नवनवीन उपक्रमांची माहिती दिली. प्राचार्या सौ. मनीषा पवार यांनी शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत शिक्षीकांकडून करण्यात येत असलेल्या सर्व बाबींची माहिती दिली. तसेच पालकांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता विद्यार्थ्यांना सर्वोत्तम, सर्व गुण संपन्न शिक्षण देण्याचा प्रयत्न स्कूल कडून नेहमीच करण्यात येत असल्याचेही सांगितले. त्यामुळे पालक वर्गांमधून देखील शाळेबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

       प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी चिमुकल्यांनी विविध देशभक्तीपर गाण्यांवर अप्रतिम नृत्य सादर केले. शाळेमध्ये करण्यात आलेली सजावट सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. यावेळी जेऊर पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षिका नलिनी खंडागळे, दीपा पवार, वेदिका मगर, पूजा पवार, अंजली धनवळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

शाळेमध्ये नवीन प्रवेशात सुरुवात ! 

नर्सरी, एल.के.जी, यु.के.जी. वर्गांसाठी शाळेमध्ये प्रवेशास सुरुवात झाली असल्याची माहिती नलिनी खंडागळे यांनी दिली. तरी शाळेत मर्यादित प्रवेश देण्यात येत असल्याने पालकांनी आपल्या पाल्यांच्या उज्वल भविष्यासाठी स्कूलच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचे आवाहन खंडागळे यांनी केले आहे.



शाळेची वैशिष्ट्ये 

* मर्यादित प्रवेश * मुलांकडे वैयक्तिक लक्ष * मुलांच्या प्रगती बाबत पालकांशी संवाद * अद्यावत क्लासरूम * सुसज्ज मैदान * हसत खेळत शिक्षण * अनुभवी व उच्चशिक्षित शिक्षिका * शिस्त अन् स्वच्छता * शिक्षणाबरोबरच मैदानी खेळ * 

प्रवेशासाठी संपर्क :-

नलिनी खंडागळे...9527553108  / 8999172233

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post