संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील दोघांना बेड्या; कोर्ट म्हणाले....

 


माय नगर वेब टीम 

पुणे : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. आज सकाळी या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पोलिसांनी पुण्यातून अटक केली होती. तसेच त्यांना मदत करणाऱ्या आणखी एका आरोपीला देखील अटक करण्यात आली. यानंतर पोलिसांनी या तिन्ही आरोपींना केज रुग्णालयात दाखल केले. यावेळी कोर्टाने या तिघांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.


कोर्टात नेमके काय घडले?

आरोपींना 15 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी यावेळी सीआयडीच्या एसआयटी टीमकडून कोर्टात करण्यात आली. हे टोळीने गुन्हे करणारे आरोपी आहेत. संघटित गुन्हे करून दहशत निर्माण करणे जिल्ह्यात नवीन उद्योगधंदे करायला आलेल्या कंपन्यांना धमकावणे हा यांचा पेशा आहे. या आरोपींना संतोष देशमुख यांच्या हत्येचा अजिबात पश्चाताप नाही. संतोष देशमुख यांचा खून यांनी एंजॉय केला आहे. या आरोपीना आता आळा घालणे गरजेचे आहे, त्यामुळे तपासासाठी आरोपींना 15 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी असा युक्तीवाद कोर्टात करण्यात आला.

तर दुसरीकडे आरोपींच्या कोठडीसाठी एसआयटीकडे असलेलेले मुद्दे पुरेसे नाहीत. जवळपास या गुन्ह्यातल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. विष्णू चाटे यालाही आधीपासूनच अटक करण्यात आलेली आहे. डिजिटल एव्हिडन्स प्राप्त झाले असे पोलीस म्हणत आहेत. आरोपींना केलेल्या कृत्याचा पश्चाताप नाही असे म्हणता येणार नाही, असा युक्तिवाद यावेळी आरोपींच्या वकिलांनी केला. दरम्यान न्यायालयानं दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडली सुनावली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबरला अपहरण करण्यात आले होते. ते ज्या गाडीनं प्रवास करत होते, त्या गाडीला थांबवून सहा ते सात जणांनी त्यांचे अपहरण केले. यानंतर त्यांना जबर मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post