माय नगर वेब टीम
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठे आरोप केले जात आहे. काल बीडमध्ये आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्यातील अनेक मोठे नेते बीडमध्ये दाखल झाले. अंजली दमानिया या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करत आहेत. वाल्मिक कराड यांना अटक करण्याची मागणी ही सातत्याने केली जातंय. यासोबतच धनंजय मुंडे यांच्याही राजीनाम्याची मागणी आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास हा सीआयडीकडे आहे.
वाल्मिका कराड यांच्या पत्नीची सीआयडीकडून दोन तास चाैकशी करण्यात आली. या हत्येचा तपास हा सीआयडीकडे गेल्यापासून तपासाला वेग आल्याचे बघायला मिळतंय. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार सीआयडीकडून आतापर्यंत शंभरहून अधिक लोकांची चाैकशी ही करण्यात आलीये. आज सहा जणांची चाैकशी सुरू आहे.
बीडला न्याय द्यायचा असेल तर सांगा फेकतो राजीनामा; मंत्रिपद कशाला पाहिजे, मुडदे पाडायला? खा. सोनावणेंचा मुंडेंना सवाल
आज सुद्धा सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून असून सहा जणांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार असून या फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सीआयडीचे अधिकारी प्रयत्न करताना दिसत आहेत. आरोपींना अटक करण्यासाठी प्रशासनाकडून दबाब आहे. त्यामध्येच अंजली दमानिया यांनी फरार आरोपींबद्दल मोठा खुलासा केला.
अंजली दमानिया यांनी दावा केला की, फरार असलेल्या तिन्ही आरोपींचा खून करण्यात आलाय. मात्र, त्यावर अजून पोलिसांकडून काही भाष्य करण्यात नाही आले. तशा प्रकारचा आपल्याला फोन आणि मेसेज आल्याचे त्यांनी म्हटले. शरद पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा होणार असल्याचे विधान परिषदेमध्ये स्पष्ट केले. धनंजय मुंडे यांनीही आरोपींना फाशीची शिक्षा द्या, असे म्हटले.
Post a Comment