अबब! राज्यात जीबीएसचा कहर

 


माय नगर वेब टीम 

मुंबई - पुण्यापाठोपाठ आता जीबी सिंड्रोमनं राज्यात आपले हातपाय परसले आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातही जीबीएसनं शिरकाव केल्यामुळे संकट वाढलंय. नेमके कुठे कुठे जीबीएसचे रुग्ण आढळले आणि त्याचा सामना कसा करणार यावरचा विशेष रिपोर्ट. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून जीबी सिंड्रोमने थैमान घातले आहे. अवघ्या दहा दिवसांत .रुग्णांची संख्या १११ वर गेली आहे.


राज्यात जीबीएसचं थैमान

पुणे

111 रुग्ण


नागपूर

6 रुग्ण


कोल्हापूर

2 रुग्ण


सोलापूर

2 संशयित रुग्ण


तर एका संशयिताचा मृत्यू


एका बाजूला रुग्ण संख्या वाढत असताना प्रशासनही आता सतर्क झालं आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनीही जीबी सिंड्रोममुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान पुण्यात GBSची लागण झालेल्या रुग्णाचा सोलापुरात मृत्यू झाला आहे. याची दखल घेत आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीतही जीबीएस सिंड्रोमवर चर्चा झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी काय निर्देश दिलेत पाहुयात.



महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट

शासकीय रुग्णालयात उपचारासाठी विशेष व्यवस्था

जीबीएसवर ठोस अशी उपचारपध्दती नसली तरी प्रचलित उपचारांनी रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात असं आरोग्य तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post