नगर-पुणे रोडवर गॅसचा वास!, ढोरमले, नुलकेंचा पराक्रम चर्चेत...

 


माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर : नगरमध्ये सोमवारी गॅस वाहतूक करणारा टँकर लिकेज झाल्याची घटना घडली. मात्र कोणतीही जीवीत हानी झाली नाही. ही घटना ताजी असतांनाच आता नगर-पुणे महामार्गावर गॅसचा वास येऊ लागला आहे. ढोरमले आणि नुलके यांचा गॅसचा काळाबाजार अनेक दिवसांपासून चर्चेत असून या काळ्या धंद्यांवर पोलिस प्रशासन कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

नगर-पुणे महामार्गावर अनेक अवैध धंद्यांनी डोके वर काढले आहे. कामरगाव घाटात लुटमार करणाऱ्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. या घटना रोखण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरले आहे. अशाचत आता नगर-पुणे महामार्गावर गॅसचा काळा बाजार सुरु असलेला रात्रीस खेळ चाले हा कार्यक्रम सुरु असल्याची खात्रीशीर माहिती आहे. 

गॅसच्या रात्रीस खेळ चाले या कार्यक्रमामुळे मात्र परिसरातील नागरिकांच्या जीवीतास धोका होऊ शकतो असे नागरिकांमधून बोलले जात आहे. धुमाळ दादांचा आशिर्वाद चर्चेत आल्याने ढोरमले, नुलके यांनी नामी शक्कल लढविली असल्याचे सांगितले जात आहे. 

महामार्गावर गॅस लिक झाल्याने अनेक अपघात झाल्याची उदाहरणे आहेत. नगर-पुणे महामार्गावर सुरु असलेला गॅसचा काळाबाजार नागरिकांसाठी जीवघेणा ठरु शकतो. त्यामुळे याबाबत प्रशासन कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post