माय नगर वेब टीम
अहिल्यानगर - मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख ह्यांची निर्घृण हत्याप्रकरण हे मानवतेला काळीमा फासणारे आहे. आरोपींनी देशमुख ह्यांची केवळ हत्या केली नाही तर त्यांच्या मृतदेहाची विटंबना करून त्याचे फोटो व्हिडिओ प्रसारित करून दहशत माजवण्याचा प्रकार केला आहे. मुख्य आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे, ह्या घटनेने महाराष्ट्र राज्याची प्रतिमा मलिन झाली असल्याची टीका डॉ. दिलीप पवार यांनी केली.तसेच ह्या कुटुंबाला पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली
सर्वपक्षीयांकडून निंबळक येथे निषेध आणि शोकसभा
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ निंबळक पंचक्रोशीतील नागरिकांनी जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी आयोजित शोकसभेत ते बोलत होते. यावेळी रामदास कोतकर, संदीप गेरंगे, उद्योजक अजय लामखडे ह्यांची आदरांजलीपर भाषणे झाली. उपस्थितांनी काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला.
शोकसभेसाठी बी. डी. कोतकर, मच्छिंद्रनाथ म्हस्के, दत्तात्रय दिवटे, ॲड. राहुल ठाणगे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. शोकसभेचे निवेदन महादेव गवळी यांनी केले.
कर्तव्यात कसूर केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना सहआरोपी करण्याची ग्रामस्थांची मागणी
संतोष देशमुख यांच्या हत्यामागे असणारे मुख्य सूत्रधार तसेच आरोपींचे पाठीराखे राजकीय नेते यांसह ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी कर्तव्य बजावणीत कसूर केला आहे त्यांना सहआरोपी करण्यात यावे, त्यांच्यावर देखील मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. सदर खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा. आरोपींना तातडीने कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सरपंच परिषदेच्या वतीने आबासाहेब सोनवणे यांनी केली.
Post a Comment