विराट कोहलीचा पत्ता कट, 'हा' खेळाडू बनणार आरसीबीचा नवा कॅप्टन


 

माय नगर वेब टीम

RCB Captain : आयपीएल २०२५ ला लवकरच सुरुवात होणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इंडियन प्रीमियर लीगचा नवा सीझन सुरु होईल असे म्हटले जात आहे. यंदाच्या सीझनमध्ये अनेक टीम्स नव्या कॅप्टन्स मैदानामध्ये उतरणार आहेत. या टीम्समध्ये आरसीबी म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा देखील समावेश होतो. फाफ ड्यु प्लेसिसला रिलीज केल्याने आरसीबीचा नवा कॅप्टन कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


आयपीएलच्या लिलावामध्ये आरसीबीने फाफ ड्यु प्लेसिससह अनेक खेळाडूंना रिलीज केले. मागच्या सीझनमध्ये तो आरसीबीचा कॅप्टन होता. तेव्हा तो गेल्यानंतर आरसीबीचा कॅप्टन कोण असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. विराट कोहली पुन्हा एकदा आरसीबीचा कॅप्टन बनू शकतो असे म्हटले जात होते. मिळालेल्या अहवालानुसार, रजत पाटीदारकडे नव्या सीझनमध्ये आरसीबीकडे कॅप्टनशिपची धुरा दिली जाणार आहे. पण अजूनही टीम मॅनेजमेंटकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.


रजत पाटीदारने सैय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीमध्ये चांगला खेळ केला. तो मध्य प्रदेश टीमचा कॅप्टन होता. चांगले नेतृत्त्व करत त्याने टीमला फायनलपर्यंत पोहोचवले. रजतने ९ इनिंग्समध्ये ४२८ धावा केला. त्याचा स्टाईक रेट १८६.०८ इतका होता. तीन अर्धशतक करत तो सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधील सर्वात जास्त रन्स करणारा दुसरा बॅट्समन बनला. त्याच्या या कामगिरीमुळे येत्या सीझनमध्ये तो आरसीबीचा कॅप्टन बनू शकतो असे म्हटले जात आहे. कॅप्टनशिपसाठी त्याला रिटेन करण्यात आले आहे असेही लोक म्हणत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post