माय नगर वेब टीम
अहिल्यानगर - नगर दक्षिणेतील दुष्काळी भाग पाणीदार करण्याच स्व . बाळासाहेब विखेंचे स्वप्न आम्हीच पुर्ण करणार आहोत . साकळाई योजनेसाठी सुजय विखे यांनी मोठे काम केले . मात्र या योजनेबाबत लोकांचा बुद्धीभेद करून लोकसभेला निवडून आलेल्या खासदाराला साकळाई योजनेसाठी काय करायच हे माहित आहे का ? विधासभेला स्वतः च्या तालुक्यातील लोकांनी नाकारले ते साकळाई योजना करणार काय ? आगामी जिल्हा परिषद निवडणूकीत महायुतीचे उमेदवार निवडून द्या , साकळाई योजनेची जबाबदारी माझी असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री ना . राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथे बाजार समितीचे संचालक संजय गिरवले यांनी सुरू केलेल्या पेट्रोल पंप उद्घाटन प्रसंगी ना . विखे पाटील बोलत होत . यावेळी आ. शिवाजीराव कर्डिले , आ . विक्रम पाचपुते , भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग , संजय गिरवले , शुभम गिरवले , दिपक दाते , सचिन कोतकर , उपसभापती रभाजी सुळ , संतोष म्हस्के , संदेश कार्ले , अभिलाष घिगे आदींसह तालुक्यातील राजकीय नेते , कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना . विखे म्हणाले नगर - श्रीगोंदा तालुक्यातील १२ हजार हेक्टर क्षेत्र साकळाई योजनेमुळे ओलीताखाली येणार आहे . मात्र साकळाई योजनेला आडकाठी आणण्याचे काम पुणेकर मंडळी करायचे . माजी खा . सुजय विखेंनी साकळाई सर्व्हेक्षण पुर्ण केले . पाणी उपलब्ध असल्याचा दाखला मात्र पुणेकरांनी दिला नाही . राज्याचा जलसंपदा विभाग माझ्याकडे आल्याने आता पुणेकरांची दादागिरी मोडून काढणार असल्याचे ना . विखे यांनी सांगितले . लोकसभेला साकळाई बाबत लोकांचा बुद्धीभेद करून , खोटे आश्वासन देऊन खासदारकी मिळविली . विधानसभेला बारा झीरो करू म्हणाऱ्यांना स्वतः च्या तालुक्यानेच नाकारले.
नगर - श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची साकळाई योजना मार्गी लावण्याच काम मी करणार आहे . मात्र आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत महायुतीचे उमेदवार निवडूण द्या , मग साकळाईची जबाबदारी माझी असल्याचा शब्द ना . राधाकृष्ण विखे यांनी दिला.
मुख्यमंत्री अन् बारा झीरोचे स्वप्न
लोकसभा निवडणूकीत मिळालेल्या यशामुळे काहींना मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडले . तर खासदारकी मुळे हवेत गेलेल्यांना बारा झीरोचे स्वप्न पडले . मात्र विधानसभा निवडणूकीत जनतेनी दिवसा स्वप्न बघणाऱ्यांना स्वतः च्या मतदार संघातच चारीमुंड्यात चीत करून जमिनीवर आणल्याचा टोला थोरात व लंके यांचा नामोउल्लेख टाळत ना . विखे यांनी मारला
Post a Comment