दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभे करणार; खासदार नीलेश लंके यांचा निर्धार

 


हंगा येथे दिव्यांग रोजगार व व्यवसाय कार्यशाळा

 माय नगर वेब टीम 

पारनेर :  दिव्यांगांना शासकीय मदत मिळवून देण्यापेक्षा ते स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजेत. प्रत्येक दिव्यांग हा कोणावर तरी अवलंबून असतो. आमच्या दिव्यांग प्रतिष्ठानची एकच इच्छा आहे की दिव्यांग बांधव हा स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे. तो त्याच्या कुटूंबाचा कुटूंबप्रमुख झाला पाहिजे असा निर्धार खासदार नीलेश लंके यांनी केला. 

     सी बी कोरा ग्रामोद्योग संस्था, सुक्ष्म, मध्यम व लघू मंत्रालयाचा खादी व ग्रामोद्योग आयोग व नीलेश लंके प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यामाने सोमवारी हंगा येथे दिव्यांग महारोजगार व व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत खासदार नीलेश लंके यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधव मोठया संख्येने सहभागी झाले होते. यावेळी खादी ग्रामोद्योग संघ, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी तसेच समाज कल्याण विभागाचे सहाययक आयुक्त उपस्थित होते.  

        यावेळी बोलताना खा. लंके म्हणाले, दिव्यांगांसाठीच्या केंद्र व राज्य सरकारच्या योजना तसेच दिव्यांगांसाठी काम करणारे महामंडळे यांच्या संयुक्त विद्यमाने या मार्गदर्शन शिबिराचे  आयोजन करण्यात आले आहे. विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागांच्या योजनांची माहीती देत या योजनांचा लाभ दिव्यांगांना देण्याची ग्वाही दिली. काही अधिकाऱ्यांनी जागेवरच मंजुरी देत सकारात्मक भुमिका घेतली. त्याचा नगर दक्षिण मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना निश्चितपणे होईल असा विश्वास खा. लंके यांनी यावेळी व्यक्त केला.

 प्रत्येक तालुक्यात व्यवसाय मार्गदर्शन शिबिर  

आज बेरोजगारीचा प्रश्न भयंकर आहे. बेरोजगारीवर मात करण्यासाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यासंदर्भात आपली काही अधिकाऱ्यांशी चर्चा झालेली आहे. यासंदर्भात संबंधित केंद्रीय मंत्र्यांशी आपली चर्चा झाली असून प्रत्येक तालुक्यात लवकरच उद्योग मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे खा नीलेश लंके यांनी सांगितले.

उद्योगांना ३० ते ७० टक्क्यांपर्यंत अनुदान  

  आज नोकरी मिळणे मुश्किल झाले असून तरूणांना व्यवसायाचे मार्गदर्शन देउन त्यासाठी आर्थिक मदत दिली तर तरूण उद्योजक होउ शकतील. केंद्र सरकारच्या माध्यमातून ३५० ते ४०० असे उद्योग आहे की त्यांना ३५ ते ७० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येते. ग्रामीण भागातील बेरोजगारांना या योजनांची माहीती नाही. या योजनांची माहीती मिळावी यासाठी उद्योग मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त बेरोजगारांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम आपण करणार आहोत. 

खासदार नीलेश लंके 

लोकसभा सदस्य 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post