माय नगर वेब टीम
पारनेर : खासदार नीलेश लंके यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या नगर विभागीय नियंत्रकांना नगर ते पोखरी बस सेवा सुरू करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. त्यांच्या पत्राची दखल घेऊन नगर ते पोखरी बस सेवा सुरू करण्यात आली असून ही सेवा सुरू झाल्याने पोखरी व परिसरातील ग्रामस्थांनी खा. नीलेश लंके यांच्याप्रती ऋण व्यक्त केले आहे.
नगर ते पोखरी ही बस सेवा अनेक वर्षे सुरू होती. त्यामुळे पोखरी व परीसरातील प्रवाशांची मोठी सोय होत होती. मध्यंतरी ही बस सेवा बंद झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत होते. पोखरी परिसरातील विद्यार्थी, शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी ही बससेवा अतिशय सुलभ होती. बस सेवा बंद झाल्याने या भागातील प्रवाशांना प्रवासासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना अवैध वाहतूकीचा मार्ग नाईलाजाने स्विकारावा लागतो. ते टाळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने नगर ते पोखरी ही बस सेवा सुरू करण्यासंदर्भात नगर विभागाच्या विभाग नियंत्रकांना खा. लंके यांनी पत्र दिले होते. खा. नीलेश लंके यांच्या नगर येथील संपर्क कार्यालयातील स्वीय सहाय्यक संतोष हांडे यांनी या प्रकरणी विभाग नियंत्रकांकडे पाठपुरावा केला होता.
दरम्यान, बस सेवा सुरू झाल्यामुळे पोखरी व परिसरातील प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. बसचे पोखरी गावामध्ये आगमन झाल्यानंतर जल्लोषात स्वागत करण्यात आले. पहिल्यांना बस घेऊन आलेल्या चालक तसेच वाहकांचा यथोचित सन्मान करण्यात येऊन त्यांना सर्वतापरी सहकार्य करण्याची ग्वाही पोखरी व परिसरातील प्रवाशांच्या वतीने देण्यात आली.
Post a Comment