कुटुंबियांना मदतीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर - श्रीगोंदा येथे झालेल्या घटनेतील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांची राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी घरी भेट घेवून सांत्वन केले. या संदर्भात उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांचीही त्यांनी भेट घेतली, यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.
मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना शासनामार्फत मदतीसाठी तातडीने प्रस्ताव तयार करून सादर करण्याचे निर्देशही मंत्री श्री.राणे यांनी प्रशासनाला दिले.
यावेळी आमदार संग्राम जगताप, आमदार विक्रम पाचपुते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, तहसीलदार क्षितिजा वाघमारे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे आदी उपस्थित होते.
Post a Comment