धनंजय मुंडेंची ‘त्या’ प्रकरणात चौकशी होणार, कारण आले समोर...

 


माय नगर वेब टीम 

मुंबई - बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे अडचणीत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे पाय आणखी खोलात गेले आहेत. मंत्री धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना ७३ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला होता. याप्रकरणी अजित पवार अॅक्शन मोडवर आले आहेत. धनंजय मुंडे यांची चौकशी करण्यासाठी अजित पवारांनी समिती नेमली असून एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश अजित पवारांनी दिले आहेत.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. धनंजय मुंडेंवरील आरोपांची आता चौकशी होणार आहे. यासाठी अजित पवारांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. धनंजय मुंडेच्या चौकशीसाठी अजित पवारांनी पक्षांतर्गत समिती नेमली असून सुरेश धस यांच्या ७३ कोटींच्या आरोपांची चौकशी होणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

बीड जिल्हा नियेाजन समितीच्या निधी वाटपात दुजाभाव झाला असून या कामांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आला आहे. नियोजन समितीची बैठक होताच आता 2023-24 आणि 2024-25 सालच्या जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची चौकशी करण्यात यावी. त्यासाठी विशेष चौकशी पथक गठीत करण्यात आली आहे.

यामध्ये धाराशिवचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर हे अध्यक्ष असतील, तर अर्थ आणि सांख्यिकी संचलनालय अपर संचालक म. का. भांगे आणि जालना जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सुर्यवंशी या तीन सदस्यीय पथक समिती चौकशी करणार आहे. हे पथक मंजूर झालेल्या कामांची सद्यस्थिती, त्या कामांना दिलेली तांत्रिक मान्यता आणि कार्यारंभ आदेश, तसेच प्रशासकीय मान्यता दिलेली कामे, त्याकरिता निधी वितरण याची चौकशी करणार असून एका आठवड्यात या समितीने हा अहवाल सादर करावा, असे आदेश राज्याचे अवर सचिव सुषमा कांबळी यांनी दिले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post