माय नगर वेब टीम
दक्षिणात्य अभिनेत्री समांथाचे नागा चैतन्यसोबत घटस्फोट झाल्यानंतर त्या दोघांची खूप चर्चा झाली. त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच नागा चैतन्य शुभितासोबत दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला. त्यानंतर आता समांथा पुन्हा रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा रंगली आहे.
समांथाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर वर्ल्ड पिकलबॉल लीग मॅचचे काही फोटो शेअर केले आहेत. चेन्नई सुपर चँप्स या पिकबॉल टीमची समांथा मालकीण आहे. तिने या मॅचचे काही फोटो इंन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या फोटोमध्ये समांथा दिग्दर्शक राज निदिमोरु यांच्या सोबत दिसत आहे. दोघांचे फोटो पाहून राज आणि समांथा यांच्या रिलेशशिपबाबत चर्चा रंगत आहेत याविषयी समांथा किंवा राज यांनी कोणतीही अधिकृत खुलासा केलेला नाही.
कोण आहे राज निदिमोरु?
‘द फॅमिली मॅन’, ‘फर्जी’, ‘सिटाडेल हनी बनी’, ‘गन्स अँड गुलाब’ या वेबसीरिजचं दिग्दर्शन राज आणि डीके यांनी केले आहे. या दोघांपैकी राज निदिमोरु आणि समांथा हे दोघे सध्या रिलेशनशीपमध्ये असल्याचा अंदाज समांथाच्या चाहत्यांना आहे. ‘सिटाडेल’ आणि ‘द फॅमिली मॅन’ या वेबसीरिजसाठी समांथाने राजसोबत काम केले आहे. हे दोघं आता ‘रक्तब्रम्हांड’ मध्ये एकत्र काम करत आहे. समांथाने दाक्षिणात्यसह बॉलीवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची एक वेगळी कछाप निर्माण केली आहे. लवकरच ती असून फॅमिली मॅन 2 मध्ये ती दिसणार आहे.
Post a Comment