नगर तालुक्यातील रूईछत्तीसी येथील लॉजींग वर एलसीबीचा छापा, आढळून आल्या ११ महिला व मुली...



माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर  - नगर तालुक्यातील रूईछत्तीसी येथील वेश्याव्यवसाय सुरु असलेल्या साई लॉजींग वर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत पिटा कायदयांतर्गत कारवाई केली आहे. या ठिकाणी पोलिसांना ११ महिला व मुली आढळून आल्या आहेत. पोलिसांनी त्या सर्वांची सुटका करत लॉजींग मालकासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. 

पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिनेश आहेर  यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन अवैध धंद्याचे कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. या आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील उपनिरीक्षक तुषार धाकराव व पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, अतुल लोटके, गणेश लोढे, संतोष खैरे, सोमनाथ झांबरे, शिवाजी ढाकणे, रोहित येमुल, भाग्यश्री भिटे व उमाकांत गावडे यांचे पथक तयार करुन त्यांना अवैध धंद्याची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना देवुन पथकास रवाना केले होते.  

पथकातील उपनिरीक्षक तुषार धाकराव यांना गुप्त बातमीदारा मार्फत साई लॉजींग, रूईछत्तीसी,ता.अहिल्यानगर येथे इसम नामे भैय्या उर्फ गणेश संपत गोरे, रा.रूईछत्तीसी, ता.अहिल्यानगर हा त्याचे साथीदारासह महिलाकरवी कुंटणखाना (वेश्याव्यवसाय) चालवत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. तपास पथकाने सदरची माहिती पोनि/राजेंद्र इंगळे, एएचटीयु, अहिल्यानगर यांना दिली.त्यानंतर तपास पथक पोनि/राजेंद्र इंगळे यांचेसह छापा कारवाई करणेबाबत रवाना झाले. 

तपास पथकाने अहिल्यानगर ते सोलापूर महामार्गावरील रूईछत्तीसी येथील साई लॉजींग येथे चालणाऱ्या कुंटणखान्यावर खात्री करण्याकरीता पथकातील पोलीस अंमलदार बनावट ग्राहक म्हणुन पाठविले.तपास पथकाने नमूद लॉजींगमध्ये वेश्याव्यवसाय चालू असलेबाबत खात्री पटल्यानंतर पंचासमक्ष लॉजींगवर छापा टाकुन इसम नामे शंभु उर्फ शुभम अशोक पाळंदे (वय 29, रा.मुलणमाथा, ता.राहुरी) यास ताब्यात घेऊन पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यातुन 20,000/- रूपये किंमतीचा एक मोबाईल व 1,000/- रूपये रोख रक्कम असा एकुण 21,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.ताब्यातील आरोपीस विश्वासात घेऊन पंचासमक्ष विचारपूस केली असता साई लॉजींग हे भैय्या उर्फ गणेश संपत गोरे (रा.रूईछत्तीसी, ता.अहिल्यानगर) व त्याचा साथीदार मनोज आसाराम गावडे, (रा.धानोरा, ता.आष्टी, जि.बीड) असे वेश्या व्यवसाय करतात. 

तसेच राणा, रा.मुंबई पुर्ण नाव माहित नाही हा त्यांना वेश्याव्यवसायाकरीता महिला पुरवितो अशी माहिती सांगीतली.ताब्यातील आरोपी शुभम अशोक पाळंदे याचेसह साई लॉजींगची पाहणी करता लॉजींगमधील रूममध्ये 11 महिला मिळून आल्या.नमूद महिलाकडे विचारपुस करता त्यांनी भैया गोरे, मनोज गावडे यांनी राणा याचे मार्फतीने आम्हास वेश्या व्यवसायाकरीता आणल्याचे सांगुन, ग्राहकाकडून पैस घेऊन, त्यामधुन आम्हास पैस देतात व आमचेकडून वेश्याव्यवसाय करून घेतात. वेश्याव्यवसायातून मिळणाऱ्या पैशावर आमची उपजीविका चालते, अशी माहिती सांगीतली.नमूद पथकाने वर नमूद महिलांची सुटका केलेली आहे. 


तपास पथकाने साई लॉजींग, रूईछत्तीसी, ता.अहिल्यानगर येथे छापा टाकुन केलेल्या कारवाईमध्ये आरोपी भैय्या उर्फ गणेश संपत गोरे, रा.रूईछत्तीसी, ता.अहिल्यानगर (फरार), मनोज आसाराम गावडे, रा.धानोरा, ता.आष्टी, जि.बीड (फरार), शुभम अशोक पाळंदे, वय 29, रा.मुलनमाथा, ता.राहुरी, जि.अहिल्यानगर, राणा पुर्ण नाव माहित नाही (फरार)  हे स्वत:चे आर्थिक फायदयाकरीता 11 महिलांकडून कुंटणखाना चालवून त्यावर आपली उपजिवीका करताना मिळून आल्याने त्यांचेविरूध्द महिला पो.हे.कॉ. भाग्यश्री भिटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात बीएनएस 143 (3), 3 (5) सह  स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास (प्रतिबंध) कायदा 1956 चे कलम 3, 4, 5, 6, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post