शिर्डी हादरली, हत्याकांडाचा CCTV समोर, हल्ल्यात दोघांचा मृत्यू; सुजय विखे स्पष्टच म्हणाले…



माय नगर वेब टीम 

शिर्डी - कोट्यवधी साई भक्तांचं श्रद्धा स्थान असलेल्या शिर्डीत झालेल्या हत्याने एकच खळबळ उडाली आहे. या हत्याकांडाने शिर्डी हादरली आहे. साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला झाला आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. पहाटे कामावर जात असताना ही घटना घडली. शिर्डीत आणखी एका तिसऱ्या तरुणावरही कामावर जाताना चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना घडली.

दरम्यान, शिर्डीत झालेल्या तीन वेगवेगळ्या ठिकाणच्या घटनेत दोघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. तीन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ल्याच्या या घटना घडल्या आहेत. चारच्या सुमारास घटना घडल्याने फार लोक जागे नव्हते. दोन बॉडीज वेगवेगळ्या ठिकाणी आढळल्या. तिस-यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिर्डीत एकाचदिवसात पहाटेच्यावेळी तीन वेगवेगळ्या चाकू हल्ल्याच्या घटना घडल्याने शिर्डीत प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.

 तोच सीसीटीव्ही आता समोर आला आहे. सुभाष साहेबराव घोडे आणि नितीन कृष्णा शेजुळ यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. ते शिर्डी साई संस्थानमध्ये नोकरीला होते. सुभाष घोडे हे करडोबा नगर चौकाचे तर नितीन कृष्णा शेजुळ साकुरी शिवचे रहिवासी आहेत. रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या तिसऱ्या तरुणाचे नाव कृष्णा देहरकर असून त्याच्यावर श्रीकृष्ण नगर भागात हल्ला झाला. दरम्यान, या विषयावर बोलताना भाजप नेते आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ‘मोफत अन्नछत्र, मोफत शिर्डी करून ठेवलीय. त्यामुळे शिर्डीत गुन्हेगारी वाढतेय’ असं म्हटलं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post