शिक्षणाद्वारे महिला सक्षमीकरणाच्या समूहाच्या दृष्टिकोनाला बळकटी
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर: भारतातील आघाडीचा व्यवसाय समूह आणि मलाबार गोल्ड अँड डायमंड्सची पालक कंपनी असलेल्या मलाबार समूहाने महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमधील ५४ पात्र विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देऊन तरुणींना शिक्षणाद्वारे सक्षम करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पूर्तता केली. या विद्यार्थिनींना आर्थिक अडचणींशिवाय त्यांच्या शैक्षणिक आकांक्षा पूर्ण करण्याचा अधिकार मिळावा यासाठी शिष्यवृत्तीच्या रूपाने त्यांच्या शिक्षणाला पाठिंबा म्हणून एकूण ५,१६,००० रुपये याप्रसंगी वितरित करण्यात आले.
शिष्यवृत्ती वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे अहिल्यानगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, अहिल्यानगरचे अध्यक्ष श्री. रामचंद्र हरिभाऊ दरे, उपाध्यक्ष श्री. विवेक प्रभाकर भापकर, उपाध्यक्ष, सचिव श्री. विश्वासराव दत्तात्रय आठरे, सहसचिव श्री. जयंत रामनाथ वाघ, तसेच खजिनदार तथा अधिवक्ता दीपलक्ष्मी संभाजीराव म्हसे पाटील, कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉक्टर बाळासाहेब सागडे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य, डॉक्टर संजय कळमकर, कार्यालयीन अधीक्षक, श्री जगन्नाथ सावळे, सूत्रसंचालन, डॉक्टर सुनिता मोटे आणि देवेंद्र महाबळ, स्टोअर मॅनेजर, मलाबार गोल्ड अँड डायमंड्स या मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमातील त्यांच्या उपस्थितीने महिलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सामूहिक प्रयत्नांसह, स्त्रियांना समाजात सन्माननीय स्थान मिळविण्यात मदत करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
अहिल्यानगरमधील या शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमातून संपूर्ण भारतात शिक्षण आणि कौशल्य विकासाला पाठिंबा देण्याच्या समूहाच्या व्यापक प्रयासांना ठळकपणे अधोरेखित करण्यात आले आहे. शाश्वत उपक्रमांना पाठिंबा देण्याच्या मलाबार समूहाच्या व्यापक ध्येयामुळे भविष्यातील पिढ्यांना सक्षम बनविण्यासाठी आणि सर्वांसाठी समावेशक, शिक्षित समाज निर्माण करण्यासाठी समूह वचनबद्ध राहिला आहे.
या उपक्रमाबाबत बोलताना, मलाबार समूहाचे अध्यक्ष एम.पी. अहमद म्हणाले, "शिक्षणाद्वारे प्रगतीचा पाया रचला जातो आणि तरुणींना ज्ञानाने सुसज्ज करणे हा सकारात्मक बदल घडवून आणण्याचा सर्वेोत्तम मार्ग आहे. कारण शिक्षण हे राष्ट्राच्या प्रगतीचा पाया रचते आणि तरुणींना त्यांच्या जीवनाचा मार्ग स्वतःच आखण्यासाठी साधन आणि ज्ञानाने सुसज्ज करणे हे त्यांचे उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. या शिष्यवृत्ती केवळ मुलींसाठी आर्थिक मदत म्हणून केवळ मानल्या जाऊ नयेत; तर त्या आपल्या समाजाच्या भविष्यातील गुंतवणूक देखील आहेत. ज्यामुळे या तरुणींच्या प्रतिभेची पूर्णत्वाने भरारी आणि त्यांच्या यशाच्या पूर्ततेत भर घातली जाण्यासह, कोणत्याही आर्थिक अडचणींची त्यात बाधा येणार नाही याची खात्री केली गेली आहे."
वर्ष १९९९ मध्ये स्थापन झाल्यापासून, मलाबार चॅरिटेबल ट्रस्ट अनेक सामाजिक कल्याणकारी उपक्रमांमध्ये आघाडीवर आहे. मलाबार समूह आपल्या वार्षिक नफ्यातील ५ टक्के हिस्सा सीएसआर उपक्रमांना समर्पित करतो, ज्यामध्ये शिक्षण, आरोग्यसेवा, पर्यावरणीय शाश्वतता आणि दारिद्र्य निर्मूलन यावर लक्ष केंद्रित केले जाते.
समूहाच्या सामाजिक दायीत्व (सीएसआर) उपक्रमांतर्गत, मलाबार स्कॉलरशिप प्रोग्राम हा एक प्रमुख उपक्रम असून, उपेक्षित समुदायांमधील होतकरूंसाठी शैक्षणिक अंतर भरून काढण्यास तो मदतकारक ठरला आहे. तरुण मुलींसाठी शैक्षणिक संधी वाढवून, मलाबार समूहाचे उद्दिष्ट हे असे दूरगामी परिवर्तन घडवून आणणे आहे, जे व्यक्तींपेक्षा कुटुंबे आणि संपूर्ण समुदायांपर्यंत विस्तारणारा प्रभाव साधेल.
Post a Comment