खासदार मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेतकरी समर्थनार्थ मॅरेथॉनमध्ये हजारो धावले !



माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर :   जोश वाढविणारे संगीत आणि साउंड सिस्टम, सांस्कृतिक नृत्य, बँडपथकाने वादन आणि झुंबा सत्रामुळे शनिवारी शेतकरी व आरोग्याच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत मोठा उत्साह दिसून आला. हजारो स्पर्धक या स्पर्धेमध्ये धावले. 

     सकाळी सहा वाजता खासदार नीलेश लंके यांच्या हस्ते या मॅरेथॉनचे उद्घाटन झाले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, बाळासाहेब हराळ यांच्यासह नगर दक्षिण मतदारसंघातील विविध मान्यवर स्पर्धक यावेळी उपस्थित होते. 

     खासदार मॅरेथॉन २००५ या स्पर्धेची महिनाभरापासून तयारी सुरू होती. त्यास मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे संयोजकांनी घेतलेले परिश्रम फळाला असल्याचे दिसून आले. २ हजारांहून अधिक धावपटूंनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेत शेतकरी अणि आरोग्य सेवेच्या समर्थनार्थ सर्वच जोशात धावले. 

यावेळी बोलताना खा. लंके म्हणाले, या मॅरेथॉनमध्ये दोन हजारांवर स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. शेतकऱ्यांना समर्पित अशा स्पर्धेचे आयोजन शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी करण्यात आले होते. या स्पर्धेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पहावयास मिळाले.नगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या या मॅरेथॉनमध्ये  ग्रामीण भागातील शेतीशी संबंधीत स्पर्धकांचा सहभाग लक्षणीय होता असे लंके यांनी सांगितले.  

        प्रा. शशीकांत गाडे म्हणाले, आजपर्यंत आपण अनेक मॅरेथॉन स्पर्धा पाहिल्या, मात्र शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेली ही पहिली मॅरेथॉन स्पर्धा आहे. शेतकऱ्यांसाठी ही मॅरेथॉन आयोजित केल्याबद्दल मी नगर दक्षिणचे खासदार नीलेश लंके यांना व त्यांच्या नीलेश लंके प्रतिष्ठानला धन्यवाद देतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे, त्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ही कौतुकाची बाब आहे. दोन हजारांहून अधिक स्पर्धकांमध्ये शेतकऱ्यांचाही सहभाग दखलपात्र असल्याचे प्रा. गाडे म्हणाले. 



७० वर्षांच्या आजीबाई धावल्या !

या मॅरेथॉनमध्ये दृष्टीहीन, दिव्यांग, लहान मुले, तरूण, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी यांच्यासह लष्कराच्या ४३ जवानांनी विशेष सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे ७० वर्षांच्या आजीबाईंनी नऊवारी साडीत धावत आपली २१ वी मॅरेथॉन पुर्ण करून सर्वांपुढे प्रेरणादायी उदाहरण ठेवले.  

सामाजिक उपक्रम 

ही मॅरेथॉन केवळ धावण्याची स्पर्धा नसून शेतकरी व आरोग्यसेवेच्या समर्थनार्थ घेतलेला एक सामाजिक उपक्रम आहे. समाजाने शेतकऱ्यांचे योगदान समजून घेतले पाहिजे आणि त्यांच्या सन्मानासाठी पुढे यायला हवे. या ऐतिहासिक उपक्रमात हजारो नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.

खासदार नीलेश लंके 

लोकसभा सदस्य


समाजाच्या एकजुटीचा विजय 

ही मॅरेथॉन स्पर्धा म्हणजे समाजाच्या एकजुटीचा विजय आहे. शेतकऱ्यांसाठी हा एक नवा संदेश असून त्यांच्या हक्कांसाठी, आरोग्यासाठी आणि उज्वल भविष्यासाठी आपण सदैव त्यांच्या पाठीशी आहोत.भविष्यात असे उपक्रम सातत्याने राबविले जातील. या मॅरेथॉनच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे योगदान आणि आरोग्यसेवेचे महत्व अधोरेखित करण्यात आले. नागरिकांनी दिलेला उस्फुर्त प्रतिसाद पाहता हा उपक्रम भविष्यात आणखी व्यापक स्तरावर राबविला जाईल. 


प्रा. शशीकांत गाडे 

शिवसेना जिल्हाप्रमुख

यांची प्रमुख उपस्थिती  

ॲथेलीटीक्स असोसिएशनचे दिनेश भालेराव, साऊथ आफ्रिकेतील ९० किलोमिटर रनर रितेश खंडेलवाल आणि बंकर कॉन्राडे 

विजेते 

१० किमी पुरूष खुला गट :  चांगदेव लाटे प्रथम, प्रेम काळे व्दितीय, क्रीश्ना तृतीय

१० किमी पुरूष : सुर्यकांत पारधी प्रथम, बाजीराव बोठे व्दितीय, राजाराम लगड तृतीय

१० किमी महिला खुला गट : सुरेखा प्रथम, सई चेमटे व्दितीय, केतकी सांगळे तृतीय 

१० किमी महिला : कविता खंडलेवाल, स्वप्नाली पारधी व्दितीय, रूपाली खंडलेवाल तृतीय.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post