विकास कामांचा सिलसिला सुरूच
माय नगर वेब टीम
पारनेर : पारनेर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी साडेतीन कोटी रूपयांचा निधी मंजुर करण्यात आल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली.
खा. नीलेश लंके यांनी सांगितले की, विधानसभेनंतर लोकसभेमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यानंतर आपला विकास कामांचा सिलसिला सुरूच आहे. नागरिकांच्या मागणीतून आलेल्या रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन मंडळामार्फत निधी मंजुर करण्यात आला असून या रस्त्यांच्या कामांना लवकरच सुरूवात होईल.
इतर जिल्हा मार्ग १०८ पिंपरीपठार ते पाडळीदर्या या रस्त्यासाठी ७५ लाख, राज्य मार्ग ६० ते भोंद्रे ते कान्हूरपठार इतर जिल्हा मार्ग १९४ मध्ये सुधारणा करण्यासाठी ७५ लाख, लोणीमावळा ते दरोडी ग्रामीण माग ५८ मध्ये सुधारणा करण्यासाठी ५० लाख, सांगवी सुर्या ते वडूले ग्रामीण मार्ग ९५ मध्ये सुधारणा करण्यासाठी ७५ लाख, हंगा ते मुंगशी ते सुलतानपुर ग्रामीण मार्ग ११४ मध्ये सुधारणा करण्यासाठी ७५ लाख रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे.
नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजुर केल्याबददल भोंद्रे, कान्हूरपठार, पिंपरीपठार, पाडळीदर्या, लोणीमावळा, दरोडी, सांगवी सुर्या, वडूले, हंगे, मुंगशे, म्हसणे सुलतानपुर येथील ग्रामस्थांनी खा. नीलेश लंके यांना धन्यवाद दिले आहेत.
Post a Comment