माय नगर वेब टीम
अहिल्यानगर :अहिल्यानगर तालुक्यातील वाळकी येथील लोकमतचे प्रतिनिधी शरद कासार यांना यशवंत सेना,जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्था अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्दमाने पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कृतिशील आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक (दि.२३) रोजी आहिल्यानगर येथे संपन्न झाला. जिल्हाध्यक्ष यशवंत सेना विजय तमनर,शहराध्यक्ष कांतीलाल जाडकर,शब्बीर पठाण, एकनाथ आव्हाड, अशोक सूर्यवंशी, लक्ष्मणराव मुळीक, शर्मिला नलावडे, ज्वाला कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्याचाही यावेळी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी रंगनाथ तमनर, हरिदास पावणे,संगीता कोळेकर, राहुल थोरवे,नाना डोंगरे,रामदास शेळके, रोहिदास भालसिंग, किशोर साठे, विष्णू हगवणे, संदीप खरमाळे, निलेश कासार, रुक्मिणी कासार आदी उपस्थित होते.
Post a Comment