माय, माती, पिता, मायबोलीची महती जपा ः डॉ. सूर्यकांत वरकड



माय नगर वेब टीम

अहिल्यानगर ः  मह्या मायीच्या लुगड्याला चार चिंध्याचा पदर.. विदर्भ खाणदेश मराठवाडा माय मराठीचे प्रवेशद्वार.. ही कविता गात कवी प्रशांत मोरे, अनंत राऊत यांच्या रचना सादर केल्या. माय, माती, पिता, मायबोलीच्या संवर्धनाचा सुरेख संगम साधत कौटुंबिक नात्यातील गोडवा सांगितला आणि त्यांची महती जपण्याचे आवाहन डॉ. सूर्यकांत वरकड यांनी विद्यार्थिनींना केले.

रयत शिक्षण संस्थेचे राधाबाई काळे महिला महाविद्यालयात मराठी विभागातर्फे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे डॉ. सूर्यकांत वरकड यांनी ’कविता : माय माती’ या विषयावर त्यांनी स्वरचित व काही मराठीतील प्रख्यात कवींच्या कविता सादर केल्या. भाषा समृद्धीसाठी ग्रामीण भाषेतील विविध दाखले देऊन भाषा जतन करण्याबाबत मार्गदर्शन केले.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर थोपटे यांनी शुभेच्छा दिल्या. इतिहास विभाग प्रमुख डॉ. गणेश विधाटे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शुभांगी ठुबे, पत्रकार सचिन दसपुते, प्रा. शुभांगी दांगट आदी उपस्थित होते. याप्रसंगी मराठी विभागाच्या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या ‘अक्षर’ या हस्तलिखित नियतकालिकाचे डिजिटल प्रकाशन करण्यात आले. तसेच, मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त झालेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय मराठी विभाग प्रमुख डॉ. सचिन कोतकर यांनी करून दिला. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून अभिजात मराठी भाषेच्या साहित्यिक व सांस्कृतिक परंपरेचा आढावा घेतला. कार्यक्रमाला प्रा. मयुरी बारवकर, प्रा. स्नेहा पाटील, प्रा. हर्षिता झालानी, प्रा. रंजना सोनवणे उपस्थित होत्या. महाविद्यालयातील विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्रा. गीतांजली खाडे यांनी केले. पारितोषिक वितरणाचे वाचन व आभार डॉ. शुभांगी दांगट यांनी मानले

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post