शिक्षक कैलास खणकर यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापक सेवा कार्य पुरस्कार प्राप्त



माय नगर वेब टीम

अहिल्यानगर: वाळकी रयत शिक्षण संस्थेचे संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल वाळकी येथील मराठी विषयाचे अध्यापक विद्यार्थीप्रिय शिक्षक कैलास तुकाराम खणकर यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापन सेवा कार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था टाकळीभान तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यांच्याकडून प्रदान करण्यात आला.

 पुरस्काराचे वितरण कवीवर्य कुसुमाग्रज यांच्या मानसकन्या सुप्रसिद्ध कवयित्री व लेखिका रेखाताई भांडारे यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री अर्जुन राऊत, उपाध्यक्ष संदीप पठारे, कार्याध्यक्ष सागर पवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बाळासाहेब बोठे, स्थानिक कुल कमिटीचे अध्यक्ष विक्रम बोठे तसेच स्थानिक स्कूल कमिटीचे पदाधिकारी विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब साळुंके, पर्यवेक्षक दत्तात्रय लांडे व विद्यालयाच्या सर्व शिक्षक वृंदाने हार्दिक अभिनंदन केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post